तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीदत्त विद्यालयातील मुलींचे यश
पिंपरखेड : प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित आंतरशालेय मैदानी स्पर्धेत पिंपरखेडच्या श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी यश संपादन केले. या खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी पालक व ग्रामस्थांनी बक्षिस देऊन गौरव केला.
सी.टी बोरा महाविद्यालय शिरूर येथे पार पडलेल्या मैदानी स्पर्धेत ज्ञानेश्वरी दीपक बोऱ्हाडे हिने १४ वर्षे वयोगट गोळा फेक प्रथम क्रमांक पटकावला.दीक्षा सत्यवान खांडगे हिने १९ वर्षे वयोगट लांब उडी क्रिडा प्रकारात तृतीय क्रमांक मुक्ता कैलास थोरात हिने १७ वर्षे वयोगट थाळीफेक तृतीय क्रमांक प्राप्त केला.तसेच मीनाक्षी मंगेश गावडे हिने सतरा वर्षे वयोगट ४०० मीटर मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या खेळाडूंना शामकांत चौधरी,एफ.एन.पंचरास,किरण कोल्हे,प्रियंका दाभाडे,नितीन कोकाटे , सचिन बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.
तालुकास्तरावर मिळवलेल्या यशाचे पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी कौतुक करत या मुलींना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले.तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.के.मगर, सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे,माजी उपसरपंच नवनाथ पोखरकर, माजी उपसरपंच किशोर दाभाडे, तुकारामशेठ नरवडे,बाळासाहेब बोंबे,आबाजी पोखरकर सचिन बोंबे,दिपक बोऱ्हाडे,शेखर बोऱ्हाडे,सागर लोंढे,सचिन बोऱ्हाडे विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एफ.एन.पंचरास यांनी केले.