भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती..
टाकळी हाजी : प्रतिनिधी
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय पाचुंदकर पाटील , शिरूर तालुका अध्यक्ष काशिनाथ पाचंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कारेगाव येथील कार्यालयात नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शिरूर तालुका उपसचिव पदी सामाजिक कार्यकर्ते कोंडीभाऊ सुखदेव दुडे, उपाध्यक्षपदी रेवणनाथ जयराम नायकोडी, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब बबन उचाळे, उपकार्याध्यक्ष पदी हिरामण मनाजी सदाफुले यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल टाकळी हाजी, निमगाव दुडे या भागातून त्यांचे कौतुक होत आहे. तळागाळातील जनतेला न्याय मिळावा आणि भ्रष्टाचाराला वाचा फुटावी यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे , सरपंच अरुणाताई घोडे आणि आदर्श सरपंच दामुआण्णा घोडे प्रतिष्ठान यांनी त्यांचे अभिनंदन केले.