समस्या, मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम

0

 

रांजणगाव गणपती : प्रतिनिधी (दि.१)

 

जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज समस्या मार्गदर्शन व दर्शनसोहळा कार्यक्रम दि.२ व ३ डिसेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे आयोजन स. नं. २०२, भाऊसाहेब ढमाळ प्लॉट काळेपडळ रेल्वेस्टेशनसमोर शेवटचा बसस्टॉप इलाईट ड्रीम्स सोसायटी शेजारी, हडपसर (ता. हवेली) जि. पुणे येथे केले आहे, अशी माहिती जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान उपपीठ पश्चिम महाराष्ट्र पिठाचे व्यवस्थापक शैलेश काळे यांनी दिली.

या कार्यक्रमाला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्तांची गर्दी होणार आहे. दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ९ वाजता जगदगुरुचे संतपीठावर आगमण होईल आणि सत्कार समारंभ होईल तसचे लगेच प्रवचनाला सुरुवात होईल. सकाळी अकरा नंतर दर्शन तसेच समस्या व मार्गदर्शन संध्याकाळ पर्यंत होईल. दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते ११ प्रवचन नंतर दर्शन व समस्या मार्गदर्शन असा दोन दिवसाचा कार्यक्रम संपन्न होत असताना, दोन्ही दिवस भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

या कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र उपपीठ यांचे वतीने व्यवस्थापक श्री शैलेशजी काळे सर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.