ताठे विद्यालयाचे कराटे, कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश…
शिरूर : शेख शौकत मुजावर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित शिरूर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२२ नुकतीच रांजणगाव गणपती तसेच कुस्ती स्पर्धा कान्हुर मेसाई येथे संपन्न झाली.
शिरूर तालुक्यातील शाळांमधील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत श्री. दामोदर एन. ताठे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली चुणूक दाखवली. यामध्ये वय वर्षे १४ वजन गट ३४ किलो मध्ये शिवानी खेडेकर इ.८ वी च्या विद्यार्थिनीने कराटे स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व अंजली राठोड हीने सहभाग नोंदवला. कुस्ती स्पर्धेत वय १७ वर्षे वजन गट११० किलो यात साहिल रुपनर याने तालुकयात प्रथम महेश संजय सोनवणे याने वजन गट ८० किलो मध्ये दुसरा क्रमांक पटकविला.
मुख्याध्यापक टी.टी.वाघमारे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिशन मृत्युंजय तथा यशदा चे प्रवीण प्रशिक्षक शौकत मुजावर यांनी प्रशिक्षण दिले.
यशस्वी विद्यार्थ्यांना राजणंगाव एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बलवंत मांडगे, कारेगाव चे सरपंच निर्मलाताई शुभम नवले, ग्रामविकास अधिकारी बिबे, संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव नवले पाटील, सचिव जयवंत सरोदे , शालेय क्रिडा शिक्षक थोरात आणि शिक्षकांनी तसेच पालकांनी यशस्वी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.