टाकळी हाजी च्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पाराजी गावडे
टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि.२९)
टाकळी हाजी (ता. शिरूर) गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पाराजी बबन गावडे यांची निवड करण्यात आली.
राजकीय , सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रात ते नेहमीच अग्रभागी असतात. ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदावरून गोंधळ निर्माण झाला होता, परंतु या पदासाठी एकमेव पाराजी गावडे यांचा अर्ज आल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच अरुणा घोडे यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांच्या वर्तणुकीचा दाखला घेऊन त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडी बद्दल सरपंच अरुणा घोडे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी गावडे यांचे अभिनंदन केले.