पिंपरखेड येथे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा

बुधवारी होणार नवरत्नांचा सन्मान

0

पिंपरखेड प्रतिनिधी (दि.२८)

राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरखेड (ता.शिरूर) येथे बुधवार (दि.३०) रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक शरद बोंबे यांनी दिली.

या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या डान्स ग्रुप मधून एकूण प्रथम चार क्रमांक निवडण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ११००१, द्वितीय क्रमांकासाठी ९००१ , तृतीय क्रमांकासाठी ७००१ तर चतुर्थ क्रमांकासाठी ५००१ रूपये रकमेची पारितोषिके तर सोलो डान्स साठी स्वतंत्र बक्षीसे ठेवण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीवर नव्याने विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे देण्यात येणाऱ्या विविध क्षेत्रातील सेवा,कृषी,उद्योग,शिक्षण,अध्यात्म, समाज, आदर्श माता, पालक व वृक्ष आदि नवरत्नांच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून परिसरातील सर्व डान्स स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.