बाल चित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर वेदांत साबळे, स्वरा चाहेर,समीक्षा भिसे,कृष्णा कवडे चमकले
महाराष्ट्र शासन बाल चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश
पारनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन पंचायत समिती पारनेर यांच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बाल चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.पारनेर तालुक्यात प्रत्येक केंद्र स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये जवळजवळ सात हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. चार वयोगटांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली.
० ते ७ वर्ष वयोगटामध्ये चि.वेदांत राहुल साबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरकर झाप, ७ ते ९ वर्ष वयोगटांमध्ये स्वरा बाळू चाहेर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळकुटी,९ ते१२ वर्ष वयोगटांमध्ये समीक्षा रवींद्र भिसे न्यू इंग्लिश स्कूल पारनेर तसेच १२ ते १६ वर्ष वयोगटांमध्ये कृष्णा ज्ञानेश्वर कवडे साईनाथ हायस्कूल अळकुटी यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच प्रत्येकी चार ही गटातून प्रत्येकी २० विद्यार्थ्यांच्या चित्रकामांची जिल्हास्तरासाठी निवड झाली.
पारनेर तालुका गटशिक्षण अधिकारी बुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तालुक्यातील केंद्रस्तरावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी चित्रकार – कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे,कलाशिक्षक रोहिदास भालेराव,कलाशिक्षक कैलास श्रीमंदिलकर,रांगोळीकार कलाशिक्षक रामदास नरसाळे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक कला शिक्षकांचे अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे व पदाधिकारी तसेच पारनेर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष कानिफनाथ गायकवाड व पदाधिकारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.