निघोजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडीसोहळा

 ‘जय हरी विठ्ठल’ च्या गजरात निघोज भक्तिमय

0

 
निघोज | पारनेर तालुक्यातील निघोज येथे आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘विद्याधन कोचिंग क्लासेस’चे संचालक शिवव्याख्याते अ‍ॅड. प्रा. ज्ञानेश्वर कवाद सर यांच्या प्रेरणेने श्रीराम व कन्हैय्या भजनी मंडळ, पारनेर तालुका पत्रकार संघराज्य मराठी पत्रकार संघ यांच्या सहकार्याने भव्य दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.

राममंदिरामध्ये विधिवत पूजा झाल्यानंतर जयघोषात निघालेली ही दिंडी गावाला प्रदक्षिणा घालत मळगंगा मंदिराजवळ आली. तेथे भजनी मंडळाच्या तालावर विद्याधन क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी व भाविक भक्तांनी पारंपरिक फुगडी खेळत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या दिंडीत योगशिक्षक सोमनाथ ढवळे व योगेश कवाद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या वारीसारखा अनुभव देणाऱ्या अनेक धार्मिक कला सादर केल्या.

भजनी मंडळातील ह.भ.प. रामदास कवाद, किसन थोरात, खंडु ईधाटे, भगवान भालेकर, कचरू वरखडे, बाबाजी कवाद, जयश्री साळवे, अंकुश लामखडे, जालिंदर ढवळे, बाबाजी वाजे (पखवाज वादक), साई घोगरे यांनी आपल्या मधुर वाणीतून अभंग गात भक्तांची मने जिंकली.दिंडीचे आयोजन प्रा. भरत डोके, अपेक्षा लामखडे, मंदा जाधव, पत्रकार भास्कर कवाद यांनी समर्थपणे सांभाळले.

या भव्य सोहळ्यास शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्करराव शिरोळे, सभापती खंडुजी भुकन, उपसभापती बबुशा वरखडे, सचिन वराळ (वराळ जनसेवा फाउंडेशन), उपसरपंच माऊली वरखडे, शिवाजी लंके (किशन कन्हैय्या उद्योग समूह), दत्ताजी उनवणे, बाबाजी वाघमारे, योगेश खाडे, राजुकाका देशपांडे, अनिल शेटे, राजुभाऊ लाळगे, अशोक ढवळे, पांडुरंग लंके, विष्णु लंके, भिमाजी शेटे, मोहन कवाद, गोरख पठारे, मोहन पठारे, सुहास लंके, दिपक लंके, अविनाश जगदाळे, पोपट मावळे, शांताराम कवाद, दिलीप कवाद आदी मान्यवर उपस्थित होते.

दिंडीसोहळा यशस्वी करण्यासाठी विद्याधन कोचिंग क्लासेसच्या सर्व शिक्षकवृंद, श्रीराम व कन्हैय्या भजनी मंडळाचे सदस्य व पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी  मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.