टाकळीकर प्रासादीक दिंडीचा आषाढी वारीत भक्तिभावाने गजर

शिस्त, सेवा आणि हरिनामाचा संगम

0

टाकळी हाजी | ( साहेबराव लोखंडे )

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सध्या देहू ते पंढरपूर या पवित्र मार्गावर भक्तिभावात पार पडत आहे. या सोहळ्यात टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील “टाकळीकर प्रसादीक दिंडी (क्र. ६८)” हे विशेष आकर्षण ठरत आहे. संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ संचलित या दिंडीने हरिनामाच्या गजरात भक्तिरसात न्हालेल्या वारकऱ्यांची मने जिंकली आहेत.

भजनी वारशाची अमृतधारा
या दिंडीत आळंदीतील नामवंत कीर्तनकार, भजनकार व वादकांचा सहभाग असून, नंदू महाराज गोरे यांच्यासह कृष्णा महाराज साळुंके, बालाजी महाराज कंदे आणि आळंदीकर गुणीजन व भक्तांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिपाठाच्या तालात पंढरीच्या दिशेने उत्साहाने वाटचाल चालविली आहे.

शिस्तबद्ध व्यवस्थापन व सेवा-भावाची अनुभूती
दिंडीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष महाराज गावडे आणि गुलाब महाराज वाळुंज वारकऱ्यांच्या निवास, भोजन, पाणी, आरोग्य व्यवस्थेसाठी उत्कृष्ट नियोजन करत आहेत. शिवाजी महाराज कांदळकर भजनाची शिस्त राखतात, तर मारुतीनाना गावडे, प्रकाश गावडे, भागा हजारेसुदाम गाढवे त्यांना मदतीला सज्ज आहेत.

दिंडीचे अध्यक्ष अशोक महाराज शिंदे यांनी पाणीपुरवठा व ट्रॅक्टरची तरतूद केली आहे. उपाध्यक्ष नारायण महाराज कांदळकर भजनात भक्तिरस निर्माण करत आहेत. चोपदार व्यवस्थापनासाठी कुंडलिक उचाळे आणि संतोष गावडे सतत तत्पर असतात. माऊली नगरे सर्वांसाठी सेवा देताना दिसतात.

महिलावर्गाचा उत्स्फूर्त सहभाग
विणेकरी कारभारी शितोळेशुभम गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कौसाबाई पानगे व इतर महिलांनी तुळशीचे शिस्तबद्ध नियोजन करून वारकरी परंपरेचा सन्मान राखला आहे.

एकसंघ परिवार व भक्तिपूर्ण वातावरण
सुभाष उचाळे , ज्ञानेश्वर पवळे यांच्या पुढाकाराने रोज हरिपाठ , गवळण गायली जाते, फुगड्यांचे नियोजन केले जाते. अशोक मेचे आणि रमेश साबळे वारकऱ्यांच्या अडचणी समजून घेत समाधान करत आहेत. मुक्कामी व्यवस्था चंद्रकांत कवडे, आण्णा जाधव, नितीन गावडे, अंकुश शितोळे , हरी मेचे, सोपान बिबवे यांच्याकडून काटेकोरपणे पार पडत आहे.

आर्थिक व तांत्रिक पाठबळ
दिंडीच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी उज्जैन खामकर हे पार पाडत असून, लाईटची सुविधा लखन भाईक यांच्याकडून करण्यात येत आहे.

वारीतून उलगडणारी भक्ती, सेवा व सामाजिक एकात्मता
टाकळीकर प्रासादीक दिंडी ही आषाढी वारीतील एक तेजस्वी आणि शिस्तबद्ध दिंडी असून, यामधून भक्तिभाव, सेवाभाव आणि सामाजिक समरसतेचे दर्शन घडते आहे. टाळ, मृदंग, ओव्या व हरिपाठाच्या माध्यमातून विठ्ठलनामाचा गजर करत ही दिंडी भक्तिरसाने पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करत आहे.

ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करत, देहभान विसरून, एकच ध्यास घेऊन चालणारे हे वारकरी – पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाले आहेत. ही अध्यात्मिक यात्रा संपूर्ण समाजाला भक्ती, शिस्त व एकात्मतेचा नवा प्रकाश देणारी ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.