जांबूत येथे शेतकऱ्याची दुचाकी चोरीला

ग्रामीण भागात चोरीचं सत्र कायम

0

प्रफुल्ल बोंबे | जांबूत

शिरूर तालुक्याच्या बेट भागात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच शरदवाडी (ता. शिरूर) येथील आठ ते दहा कृषिपंप चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच, आता जांबूत येथील शेतकरी बाळू लक्ष्मण पळसकर यांची दुचाकी चोरीला गेली आहे.

पळसकर यांच्या ताब्यातील हिरो एच एफ डीलक्स कंपनीची दुचाकी (क्र. एमएच १२ केडब्ल्यू ४४७७) भरत दशरथ उचाळे यांच्या राहत्या घराजवळील पार्किंगमध्ये रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उभी करून ठेवली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठल्यानंतर दुचाकी त्या ठिकाणी न दिसल्याने त्यांनी परिसरात चौकशी केली. परंतु दुचाकी कुठेही न सापडल्याने अखेर शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी भरत दशरथ उचाळे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल आगलावे तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अशा प्रकारच्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी,अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.