धर्मवीर ट्रेकरच्या युवकांनी केले केदार कंठा शिखर सर
टाकळी हाजी |
धर्मवीर ट्रेकरच्या १७ तरुणांनी एकत्र येऊ घोड/ कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती सदस्य तथा मीना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे यांच्या समवेत शिरुर, वढू बुद्रुक, लोणीकंद, वाघोली येथील धर्मवीर ट्रेकरच्या १७ तरुणांनी एकत्र येऊ उत्तरप्रदेश मधील केदार कंठा शिखर सर केले.
केदार कंठा शिखर १२५०० फूट (३८१० मीटर) उंच आहे. तेथील प्रतिकूल हवामान, पाऊस, बर्फ आणि उंचीवर असणारी ऑक्सिजनची कमी याचा सामना करत सर्वांनी शिखर गाठले. उदय सरोदे, अभिषेक बाफना, संजय धुमाळ, वीरेंद्र सावंत, कल्पेश भंडारे, संदीप आरगडे, पवन कंद,मंगेश आरगडे यांच्या सह अनेक सवंगड्याने या शिखराच्या ट्रेक ४० किमी असून यांनी तो तीन दिवसात यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
ग्लोबल इव्हेंट्स ट्रॅव्हल्स द इंडियन ट्रेकिंग कमोनिटी या कंपनी बरोबर सांक्री( उत्तराखंड) जुडा का तलाब, केदार कंठा बेस कॅम्प, हर गाव कॅम्पमार्गे तेथील बर्फवृष्टी, खराब हवामान आणि ऑक्सिजनची कमतरता यांचा सामना करत हे अवघड शिखर सर केले आहे.
यापूर्वी सातारा तालुक्यातील (वासोटा) जंगल ट्रेक, अहिल्यानगर (हरिश्चंद्रगड), लोणावळा अंबावणे (कोरीगड), मुळशी (घनगड) व (अंधारबन) , जुन्नर (आडराई) अशी अनेक छोटे मोठे ट्रेक धर्मवीर ट्रेकर्स यांनी सर केले आहेत. विशेष म्हणजे अंधारबन व आडराई पावसाळी ट्रेक करताना जंगलांचे संवर्धन व जंगल वाढीसाठी बीजरोपण करण्याचे काम व तेथील स्वच्छता मोहीम हाती घेऊन प्लास्टिक घनकचरा व तेथील परिसर सुंदर राहण्यासाठी साफसफाई चे उत्तम काम धर्मवीर ट्रेकर्स टीमच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती प्रकाश वायसे यांनी दिली.