टाकळी हाजी |
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत गितगायान प्रकारात टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील शिक्षक प्रविण गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकविला. गायकवाड हे संगीत विशारद असून शाळेतील तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांनाही ते विनामुल्य संगीत शिक्षण देत आहेत. त्यांच्या या गीत गायनाने टाकळी हाजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांचे संकल्पनेतून विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन कोयाळी पुनर्वसन (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते. वैयक्तिक गीत गायन या प्रकारात पिंपरखेड (ता.शिरूर) शाळेचे पदवीधर शिक्षक प्रविण गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळविला.त्यांनी गायलेल्या भक्तिगीतांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शिक्षकांना या स्पर्धा आयोजित करून कलागुणांना प्रोत्साहन दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. टाकळी हाजीचे सरपंच अरुणा घोडे, दामुशेठ घोडे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर गावडे,सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, उपाध्यक्ष साहेबराव लोखंडे, शिरूरचे गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, किसन खोदडे, पवार, मुकुंद देंडगे,यांनी त्यांचे अभिनंदन केले.