व्याजाच्या पैशावरून तामखरवाडीतील तरुणास मारहाण
टाकळी हाजी |
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील एका युवकास मंगळवारी ( दि.१) व्याजाने दिलेली रक्कम परत केली नाही म्हणून लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण झाल्याची घटना घडली. टाकळी हाजीतील तामखरवाडी येथील युवक प्रताप शिवाजी गावडे ( वय २८ वर्ष) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत भाऊ थोरात (पूर्ण नाव माहित नाही) रा.मलठण ता. शिरूर याच्या विरोधात शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीस हजार रुपये रकमेच्या व्याजावरून भाऊ थोरात यांनी प्रताप गावडे यांस दगडाने आणि लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याचे धमकी दिली,असे प्रताप गावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.