टाकळी हाजी येथे विकासकामांचा शुभारंभ

0

टाकळी हाजी | 

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे नागरी सुविधा /जनसुविधा योजने अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अरुणा घोडे,उपसरपंच गोविंद गावडे यांच्या शुभहस्ते या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास साबळे, भरत खामकर, अर्जुन खामकर, सुभाष चोरे, मोहन चोरे, अशोक गावडे, पंढरी उचाळे, दत्ता दिवेकर, कोंडीभाऊ खामकर , अंकुश उचाळे, साहेबराव लोखंडे, राहुल रसाळ, अमोल रसाळ, बापू गाडीलकर, संतोष चासकर , पांडुरंग घोडे, संतोष चोरे, बबन गावडे, यशवंत गावडे, नारायण गावडे गुरुजी, संग्राम गावडे, शरद खोमणे, अक्षय खोमणे, महादू गावडे , भाऊसाहेब चोरे , अंकूश चोरे, रसिक गावडे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शुभारंभ करण्यात आलेली विकास कामे
* डोंगरगण येथे स्मशानभूमी सुधारणा करणे
( 10 लाख रुपये )
* डोंगरगण स्मशानभूमी वेटींग शेड उभारणे
( 15 लाख रुपये)
* डोंगरगण येथे विरंगुळा केंद्र उभारणे
( 20 लाख रूपये)
* साबळेवाडी रस्ता ते भाऊसाहेब चोरे वस्ती रस्ता –
( 10 लाख रुपये )
* शिरूर रस्ता ते तामखरवाडी रस्ता तयार करणे –
( 10 लाख रुपये..)
* तामखरवाडी येथे स्मशानभूमी सुधारणा करणे
( 10 लाख रुपये )
* शिनगरवाडी महादेव मंदिर रस्ता तयार करणे
( 16 लाख 90 हजार 486 रुपये)
* टाकळी हाजी येथे बाजार शेड सुधारणा करणे
( 20 लाख रुपये )
* उचाळेवस्ती कार रस्ता करणे
(10 लाख रुपये)
* होणेवाडी रस्ता करणे
( 10 लाख रुपये)

Leave A Reply

Your email address will not be published.