माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

शिरुरच्या बेट भागावर शोककळा...

0

 

जांबुत | काठापूर खुर्द (ता. शिरूर ) गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बिपीन सुदाम थिटे यांचे (दि.२७) रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात दुःखाचे वातावरण पसरले. बिपीन थिटे यांच्यावर काठापूर खुर्द येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशबापू पवार, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती देवदत्त निकम, राष्ट्रवादीचे शिरूर – आंबेगाव तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, टाकळी हाजीचे सरपंच दामूशेठ घोडे, बाळासाहेब भोर, खरेदी विक्री संघांचे संचालक बाबाजी निचित, संपत पानमंद,माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, शुभांगी पडवळ यांचेसह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे अध्यक्ष यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी शोकाकुल वातावरणात थिटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा मोठा परिवार आहे. शिरूर तालुक्यातील बेट भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने मित्र परिवार मोठा आहे. यामुळे संपूर्ण बेट भागात शोककळा पसरली होती.

काठापूर खुर्द (ता.शिरूर) येथे थिटे हे मागील पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून तर सध्या त्यांच्या पत्नी सीमा थिटे या लोकनियुक्त सरपंच म्हणून कार्यरत आहेत. थिटे यांच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या व पत्नीच्या पदाच्या माध्यमातून अनेक विकासकामे तसेच सर्वसामान्य जनतेची कामे करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. थिटे यांचे गावच्या जडणघडणीबरोबरच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.