पत्रकार अरुणकुमार मोटे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
शिरूर | दैनिक प्रभात व शिरूर तालुका डॉट कॉम चे प्रतिनिधी अरुणकुमार मोटे यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रामलिंग महिला उन्नती बहू. सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर हवेलीचे आमदार अॅड अशोक बापू पवार, शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार अरुणकुमार मोटे यांनी तालुक्यातील महसूल विभाग, पोलिस विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती, नगरपालिका प्रशासन या ठिकाणी सामन्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भिडपणे वृत्तांकन करून बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून परखड भुमिका मांडून उरलेल्या तीन आधारस्तंभांवर लक्ष ठेवण्याचे काम करत आहेत. बातमी बरोबरच त्या बातमीतील घटना, घटना घडण्यामागे असलेले राजकीय सामाजिक व आर्थिक प्रवाह व शक्ती आणि घटनांचे संभाव्य परिणाम यांचे विश्लेषण करून वाचकांपर्यंत ते पोहचवत असतात. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या या कामाची दखल घेऊन रामलिंग महिला उन्नती बहू. सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर हवेलीचे आमदार अॅड अशोक बापू पवार, शिरूरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते निर्भीड पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी अधिकारी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी, पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.