कवठे येमाईत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
टाकळी हाजी |
राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चौंडी (जि.अ.नगर) येथून कवठे येमाई ( ता.शिरूर) येथील तरुणांनी शुक्रवारी (दि.३१) ज्योत आणून भव्य मिरवणूक पार पाडली.
येथील सचिन मुंजाळ, निखिल मुंजाळ, आदीनाथ हिलाळ,
प्रज्वल मुंजाळ, दिपक मुंजाळ ,रमेश खाडे , संग्राम हिलाळ, रोहीदास हिलाळ, विठ्ठल मुंजाळ , अरुण हिलाळ , अविनाश पोकळे, निलेश पोकळे, विशाल मुंजाळ, साहेबराव मुंजाळ , भानुदास हिलाळ , बाळु हिलाळ, गुलाब मुंजाळ, किरण हिलाळ, सुखदेव देवकर, बाळशिराम मुंजाळ आदी तरुणांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.
चौंडी येथून ज्योत आणल्यानंतर मुंजाळवाडी येथे स्वागत व पुजन करून मुंजाळवाडी ते कवठे येमाई दरम्यान वाद्यांच्या गजरात, भंडाऱ्याची उधळण करत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते. अशी माहिती बापूसाहेब गावडे वि.का.सोसायटीचे संचालक भाऊसाहेब घोडे यांनी दिली.