पिंपरखेड येथील श्रीदत्त विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न…
पिंपरखेड येथील श्रीदत्त विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न…
टाकळी हाजी सत्यशोध वृत्तसेवा
पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी संस्था आयोजित वार्षिक स्नेहमेळावा मंगळवार ( दि.२५ ) रोजी उत्साहात संपन्न झाला. विद्यालयातील मुलांच्या बौध्दिक व गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांत माजी विद्यार्थ्यांना सभासद करून बरोबर घेऊन काम करण्याचे मत यावेळी सर्वांनी व्यक्त केले.
श्रीदत्त विद्यालयात दरवर्षी दिपावलीच्या सणात माजी विद्यार्थी संस्था पिंपरखेड यांच्या कडून स्नेहमेळावा आयोजित करण्यात येतो.यंदाच्या स्नेहमेळावा मंगळवारी उत्साहात संपन्न झाला.माजी विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून श्रीदत्त विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नवीन उपक्रम,संकल्पना,राबविण्यात याव्यात असे मत यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विद्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस व प्रमाणपत्र दिले जाते. याच धर्तीवर ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा हा नवीन उपक्रम माजी विद्यार्थी संस्थे मार्फत राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रा.सचिन बऱ्हाटे यांनी दिली.
माजी विद्यार्थी संस्था वाढीसाठी मास्स,मनी , मोटीव्हेशन या तीन गोष्टीसाठी सर्वांनी प्रयत्न केला तर संस्थेची निश्चितच प्रगती होईल असे मत माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष डॉ.दादाभाऊ बरकले यांनी व्यक्त केले.
माजी विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक,सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात यामध्ये सर्व सभासद माजी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आपले योगदान दिले आहे. माजी विद्यार्थी संस्था ही विद्यार्थ्यांची बौध्दिक गुणवत्ता वाढवण्यासाठी नवीन उपक्रम राबविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे अध्यक्ष प्रभाकर शेळके यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नितीन शेजवळ,राजेंद्र बोंबे, सुनील तुळे तसेच चेअरमन किरण ढोमे,उपसरपंच विकास वरे,योगेश खांडगे,विनोद बोंबे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल प्रभाकर शेळके यांचा नितीन शेजवळ व संतोष डुकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे,संतोष जगताप,पोपट गांजे, नवनाथ दाभाडे, कैलास बोंबे,बाळासाहेब वरे,अनिल वरे ,हनुमान वरे,संजय आल्हाट,विकास गायकवाड, आबाजी पोखरकर, आशोक ढोमे,लक्ष्मण थोरात, निवृत्ती मंडलिक,बाळासाहेब सालकर,गणेश बोंबे, शरद बोंबे, काशिनाथ टाकळकर व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक उपाध्यक्ष तानाजी पोखरकर यांनी केले तर आभार संतोष डुकरे यांनी मानले.