रांजणगाव गणपती येथे स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न

भक्तांची मांदियाळी... जिल्ह्यातून लोटला जनसागर

0

 

साहेबराव लोखंडे :

शिरूर |  जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पुणे जिल्ह्यातील पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम मंगळवार व बुधवार दि. 2 व 3 एप्रिल 2024 रोजी सुखकर्ता लॉन्स गार्डन मंगल कार्यालय रांजणगाव गणपती ( ता. शिरूर) येथे उत्साहामध्ये संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातून दोन दिवसांत सुमारे 25 हजार भाविक भक्तगणांनी हजेरी लावून दर्शनाचा लाभ घेतला. मंगळवारी सकाळी 10 वाजता जगद्गुरु नरेंद्र महाराजांचे आगमन झाले.यावेळी ढोलताशा व भजनाच्या गजरात स्वागत करण्यात आले. दोन दिवस संतपिठावर माऊलींचे पाद्यपूजन , प्रवचन, समस्या मार्गदर्शन , उपासक दिक्षा, आरती, महाप्रसाद असे कार्यक्रम संपन्न झाले.

कार्यक्रमाचे आयोजक व मान्यवरांचे मुख्य पीठ नाणिजधाम क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र पीठ समिती यांनी आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.