माळवाडी जिल्हा परीषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
टाकळी हाजी | माळवाडी (ता. शिरुर) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवारी ( दि.२६) मोठया उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी रेकॉर्डिंग गाण्यांवर ठेका धरत विविध कलागुण सादर करताना प्रेक्षकांची मने जिंकली. टाळ्या आणि बक्षिसांच्या वर्षावाने ग्रामस्थांनी दाद दिली.इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांनी 19 देशभक्तीपर गाणी सादर करून त्यावर सुंदर नृत्य केले.या कार्यक्रमात बहुतांशी विद्यार्थ्यांना सहभाग घेता आल्याने विद्यार्थ्यांनी सर्वांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमानिमित्त शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी पंचायत समिती सदस्या व टाकळी हाजी च्या विद्यमान सरपंच अरुणा घोडे, घोडगंगा कारखान्याचे तज्ञ संचालक सोपानराव भाकरे, निवृत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे,विक्रीकर अधिकारी गोपीनाथ भाकरे,माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, उपसरपंच आदिनाथ भाकरे, माजी उपसरपंच आनंदा भाकरे, माजी सदस्य प्रकाश भाकरे, पतसंस्था संचालक बाबाजी रासकर, योगेश भाकरे , रवी भाकरे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भाकरे, उपाध्यक्ष प्रकाश भाकरे,सर्व सदस्य, मुख्याध्यापक राजेंद्र चोरे आणि शिक्षकांनी केले.