सरकार ! गरीबाला घमेलंभर तरी वाळू दया…
नाव गरीबाचे आणि कोटकल्याण धनदांडग्यांचे ..घोडच्या वाळू ठेक्याचे दुदैवी चिञ
शिरुर – बापू जाधव
गरीबाच्या घराचे स्वप्न साकार करायचे ! गरीबाच्या घराला लागते तरी काय ? सगळ्यात अवघड विषय वाळूचा …बरं वाळू निघते कुठे नदीत आणि नदी सरकारच्या ताब्यात …एका झटक्यात मायाबाप महसुल मंञ्यांनी निर्णय घेतला ..मला गरीबांचे कल्याण करायचं , वाळू नाममाञ दरात गरीबांना दयायची मग त्यासाठी सरकारी फर्माने काढली ..ठेकेदार जरा विश्वासातील असावा या उदात्त हेतूने ठेकेदाराची निवड केली गेली.
सरकारी अमलदारांच्या चौक्या पहाता गरीबांचे कल्याण करण्यासाठी निमोणे (ता.शिरुर ) येथे ठेका सुरु झाला. चार – पाच महिने लोटले , यांत्रिक बोटी नदीतून बेसुमार वाळूचा उपसा करत आहेत. ज्या जागेवर डेपो केला तिथे वाळूची रास दिसते…दररोज अवजड वाहनातून वाळूची वाहतूक होते. सगळं काही सुरुळीत सुरु आहे…पण ही वाळू गरीबाच्या घरकुलाला नाय! गरीबाचे नशिबच फुटकं ..मायबाप सरकारने हा ठेका गरीबाच्या घरासाठी सुरु केला आहे.
पण सोन्याच्या मोलाची वाळू गरीबाच्या घराला दिली तर हा सगळ्या यंञणेचा अपमान आहे ही भावना मनात ठेवून वाळूची गाडी श्रीमंताच्या दारातच रिती होते . त्याला काय करणार! गरीबाच घर सरकारला पुर्ण करायचं आहे . पण ऑनलाईन मध्ये गरीबाचं नावच येत नाही त्याला ठेकेदार तरी काय करणार …
गरीब माणसाची सेवा करीत करीत श्रीमंत होणे यालाच राजकारण म्हणतात..अण् हे सगळं सध्या पिंपळाच्या वाडीच्या ठेक्यावर सुरुळीत सुरु आहे..
क्रमशः