सविंदणेत गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप…
ग्रामपंचायत च्या वतीने महिलांसाठी मोफत गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप...
सविंदणे | सविंदणे ( ता. शिरूर) ग्रामपंचायत च्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या महिला व बालकल्याण निधीतून महिलांसाठी आरोग्य साधने म्हणून गावातील प्रत्येक कुटुंबातील महिलांना मोफत गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. सविंदणे ग्रामपंचायत नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवत असते .
सध्या हिवाळा असल्याने व शेतीची अनेक कामे चालू आहेत आणि वृद्ध महिलांना अनेक मणक्याचे, पोटाचे, गुडघ्यांचे आजार आहेत तसेच या भागात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड चालू आहे ,दिवसभर शेतात काम केल्याने अनेक महिलांचे सांधेदुखी व पोटाचे आजार अशा अनेक समस्या महिलांना भेडसावत आहे. यातून प्रथमोपचार म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने अनोखा उपक्रम राबवत गरम पाण्याचे पिशव्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले . सुमारे गावातील अकराशे कुटुंबांना लाभ मिळाला आहे.
सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी घरोघर जाऊन प्रत्येक कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन या पिशव्यांचे वाटप केले . या उपक्रमामुळे सर्व महिलांनी व परिसरातून नागरिकांनी ग्रामपंचायत चे कौतुक केले. सविंदणे गावच्या सरपंच शुभांगी पडवळ यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत. महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण, बचत गट आर्थिक सबल करण्यासाठी उपक्रम, तसेच वृद्ध महिलांसाठी मोफत डोळ्यांचे ऑपरेशन आदी उपक्रम राबवले आहेत.
ग्रामपंचायत च्या वतीने गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप व त्यानिमित्ताने नागरिकांशी संवाद साधण्यात आला व समस्या जाणून घेतल्या. यावेळी सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच नंदा पुंडे, माजी सरपंच सोनाली खैरे, माजी उपसरपंच भोलेनाथ पडवळ , भाऊसाहेब लंघे, माजी सरपंच वसंत शेठ पडवळ , बाळासाहेब भोर, सोसायटीचे चेअरमन अरुणकुमार मोटे ,ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पडवळ , गोरक्ष लंघे, मनिषा नरवडे, मालुबाई मिंडे, रवी पडवळ, बाळासाहेब पडवळ आणि कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.