निमगाव दुडे येथे अंगणवाडी भूमिपूजन समारंभ संपन्न
शिरूर : जिल्हा नियोजन समितीच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत निमगाव दुडे (ता.शिरूर) येथे अंगणवाडी साठी ९.५० लाख रुपये रकमेची तरतूद करण्यात आली असून इमारतीचा भूमिपूजन समारंभ युवा नेते राजेंद्र गावडे , पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांचे शुभहस्ते मंगळवारी ( दि.१५) स्वातंत्र्य दिनी संपन्न झाला.
यावेळी सरपंच शशिकला अमोल घोडे, उपसरपंच शहाजी पवार , कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव, पोलीस पाटील बाळासाहेब पानगे, माऊली पानगे, अविनाश मोरे,अंकुश कांदळकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील पानगे, जालिंदर पानगे,अशोक खडसे,पंकज घोडे, संभाजी पानगे, शहाजी रामदास पवार,योगेश बारहाते, तुळशीराम दुडे, भास्कर पानगे, दिनेश पठारे, अरुण पोपट पानगे, दत्ता गायकवाड, अमोल घोडे, शांताराम पवार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल घोडे सर यांनी तर आभार सरपंच शशिकला घोडे यांनी मानले. विक्रम पवार यांनी सूत्रसंचालन केले.