साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
शिवबा संघटनेची पदाधिकारी बैठक निघोज (ता.पारनेर ) येथील संघटना कार्यालयात रविवारी (दि. १८) संपन्न झाली. यावेळी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात संघटनेचे कार्य,आंदोलने व नागरीकांचे अनेक प्रश्न सोडविल्याने नगर व पुणे जिल्ह्यातील तरुणांचा संघटनेत ओढा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पारनेर,शिरूर,जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले.
नियुक्ती करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे …
राजु लाळगे (अध्यक्ष- शिवबा दुर्गसंवर्धन परीवार महाराष्ट्र राज्य), बाळासाहेब भंडारी (उपाध्यक्ष- शिवबा दुर्गसंवर्धन परीवार महाराष्ट्र राज्य), रायंचंद गुंड (सचिव- शिवबा दुर्गसंवर्धन परीवार महाराष्ट्र राज्य), बबन तनपुरे (पारनेर तालुकाप्रमुख), यश रहाणे (युवक तालुका प्रमुख पारनेर), रोहिदास लामखडे (उपतालुका प्रमुख पारनेर), ज्ञानेश्वर खोसे (शाखाप्रमुख पाडळी दर्या), नवनाथ बरशिले (संपर्कप्रमुख पुणे जिल्हा) , हरीष कोकणे (जुन्नर तालुकाप्रमुख) , अविनाश घोगरे (शिरूर शहरप्रमुख), ओंकार जाधव (उपतालुका प्रमुख शिरूर) , स्वप्नील येवले, (उपतालुकाप्रमुख शिरूर ग्रामीण) , वैभव वहाणे (गणप्रमुख टाकळी हाजी), विजय खामकर (शाखाप्र्मुख टाकळी हाजी), समाधान दुडे (शाखाप्रमुख निमगाव दुडे) , आदि पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यावेळी शिरूर तालुका प्रमुख सोमनाथ भाकरे, युवक तालुकाप्र्मुख केशव शिंदे, स्वप्नील लामखडे, शेतकरी संघटना प्रमुख जयराम सरडे, डॉ दौलत पांढरकर, मच्छिंद्र लाळगे, बाळासाहेब नायकोडी, ऋषी शेटे, राम दिवेकर, नागेश नरसाळे, शांताराम पाडळे, चंद्रशेखर ढवण, यावेळी सुत्रसंचालन प्रा. कवडे सर यांनी केले तर आभार स्वप्नील लामखडे यांनी मानले.