महावितरणचा अवाच्या सव्वा बिले आकारून शेतकऱ्यांना शॉक

0

 

पिंपरखेड : वृत्तसेवा

महावितरणने पिंपरखेड येथील घरगुती वीज ग्राहकांना लाखों रूपयांची वीजबिले देऊन वीजबिल न भरल्याने ऐन मार्चमध्ये आर्थिक कोंडीत सापडलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला.महावितरणकडून गेले अनेक वर्षे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिलद्वारे  ग्राहकविरोधी भुमिका घेऊन सुरु असलेल्या पठाणी वसुलीबाबत ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महावितरण कंपनीने पिंपरखेड येथे वीजग्राहकांना दिलेल्या वीजबिलाप्रमाणे ग्राहकांनी दर महिन्याला वीजबिल भरले.परंतु महावितरण कंपनीने अनेक नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना थेट लाखो रुपयांची वीजबिले देऊन मोठा झटका दिला. महिन्याला ३०० ते १००० रुपयांची बिले भरणाऱ्या ग्राहकांना एक लाखा पेक्षा जास्त वीज बिल देऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुली साठी तगादा लावला. अंदाजे तसेच,अचूक मिटर रिंडीग न घेतल्याने अचानक लाखांची बिले, दंड,व्याज आकारल्याने वीज ग्राहकांना तब्बल १ लाख ते ८ लाख रूपये वीजबिलाचा शॉक देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून न घेता वीजबिल भरले नाही तर कनेक्शन कट करण्याची भूमिका घेतल्याने ऐनवेळी लाखो रुपये देऊ न शकणाऱ्या वीजग्राहकांनी हात जोडून कनेक्शन तोडू नका अशी विनंती केल्यानंतरही अनेक वर्षे नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करून मिटर जप्त केल्याचे वीजग्राहकांनी सांगितले.

अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची मार्च महिन्यात आर्थिक कोंडी झाली असताना महावितरण कंपनीने लाखो रुपयांची वीजबिले काढून वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करून गेले अनेक वर्षे नियमित बिले भरणाऱ्या वीजग्राहकांना महावितरण कंपनीने अंधारात ढकलल्याची भावाना ग्राहकांनी व्यक्त केली.

मिटर रिंडीग प्रमाणे महिन्याला वीजबिले न आकारता ग्राहकांना अचानक लाखो रुपयांची वीजबिले देऊन स्वतः ची चूक ग्राहकावर ढकलून पठाणी वसूली करणाऱ्या महावितरणने वीजपुरवठा कनेक्शन कट करून ग्राहकविरोधी भूमिका घेतल्याने कंपणीच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

पिंपरखेड हा बिबट प्रवण क्षेत्र परिसर आहे.बिबट्याचा वावर हा मानवी वस्ती वर असून घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन मनुष्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे.बिबट्याच्या हल्ल्याची घटना जीवावर बेतली तर महावितरणचे संबंधीत अधिकारी जबाबदार असतील.       
— ——- वीजपुरवठा खंडित ग्राहक

Leave A Reply

Your email address will not be published.