भागुबाई रखमा किऱ्हे यांचे निधन
टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मळगंगा देवीच्या पुजारी भागुबाई रखमा किऱ्हे यांचे शनिवारी (दिनांक १५) रोजी वृद्धापकाळानं निधन झाले. मृत्यू समयी त्या ९५ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुले,३ मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.मळगंगा देवस्थान, काशेश्र्वर दूध डेअरीचे सचिव बबन रखमा किऱ्हे, देवीचे पुजारी मारुती आणि रामदास तसेच अंजाबाई ,रंजना , संजना यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या जाण्याने किऱ्हे कुटुंबातील तसेच गावातील जुन्या जाणत्या , सुसंकृत आदर्श विचाराच्या मार्गदर्शक मातोश्री ची उणीव भासणार आहे असे टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामू शेठ घोडे यांनी भावना व्यक्त केली.