पिंपरखेड च्या श्री दत्त विद्यालयाचे इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी परिक्षेत घवघवीत यश

0

 

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.२१)

शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून विद्यालयाचा शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे.

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा निकाल २०२२ या परिक्षेत श्रीदत्त विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे

इंटरमिजीएट अ श्रेणी  प्राप्त विद्यार्थी   

तन्वी विकास ढोमे, ज्ञानेश्वरी विनय वरे, कीर्ती शरद बोंबे, सायली मच्छिंद्र सैद, रेणुका बाळशिराम बराटे, निशा बबन सैद, श्रावणी अनिल ढोबळे, यश प्रभाकर ढोमे, सुजल महादू टेमगिरे, सुजल विकास गावशेते, प्रसाद विक्रम पोखरकर, प्रणव अनिल उंडे

इंटरमिजीएट ब श्रेणी प्राप्त विद्यार्थी   

दर्शना गणेश उंडे, मानसी रवींद्र बोंबे, संस्कार राजेंद्र खांडगे, सनी प्रवीण खांडगे, ओंकार हनुमंत वरे, सुजल गणेश वरे, आदित्य संजय गावशेते,सिद्धार्थ सतीश शेळके तसेच सहा विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली.

एलिमेंटरी अ श्रेणी

निशा मारुती मिडगुले, समिक्षा विकास औटी, सुप्रिया तुकाराम नरवडे,गायत्री अनिल महामुनी, सुदर्शनी ज्ञानेश्वर ढगे ,ब श्रेणीत ३२ आणि क श्रेणीत ३५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक नितीन कोकाटे यांनी मार्गदर्शन केले.इंटरमिजीएट परिक्षेत एकूण २६ विद्यार्थी व एलिमेंटरीला एकूण ७२ विद्यार्थी बसले होते.विद्यालयाचा शेकडा निकाल शंभर टक्के लागला असल्याचे प्राचार्य आर.के.मगर यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे, सचिव प्रकाश गुजर व माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शेळके यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले .

Leave A Reply

Your email address will not be published.