फाकटे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गुलाबराव वाळुंज
टाकळी हाजी : प्रतिनिधी (दि.२५)
फाकटे (ता. शिरूर) गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गुलाबराव वाळुंज यांची निवड करण्यात आली आहे. वाळुंज यांनी यापूर्वी गावचे सरपंच पद तसेच तंटामुक्ती अध्यक्ष पद भूषविले असून राजकीय , सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक क्षेत्रात ते नेहमीच अग्रभागी असतात. याची दखल घेऊन सर्वांनुमते त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याबद्दल सामाजिक कार्यकर्ते योगेश शितोळे, विनायक राळे, विजय बोऱ्हाडे तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.