भीमाशंकर कारखाना चेअरमन पदी बाळासाहेब बेंडे तर व्हा. चेअरमन पदी प्रदिपदादा वळसे पाटील
टाकळी हाजी : प्रतिनिधी
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चेअरमन , व्हा.चेअरमन पदासाठी सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी निवड करण्यात आली. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदी बाळासाहेब बेंडे पाटील तर व्हा.चेअरमन पदी प्रदिप वळसे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
भीमाशंकर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत तीन जागा वगळता सर्व जागांची बिनविरोध निवड झाली होती.तीन जागांसाठी मतदान घेण्यात आले.
या निवडीबद्दल टाकळी हाजी चे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे,माजी सरपंच बन्सीशेठ घोडे,निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.