पारनेर मध्ये आल्यास सदाभाऊच्या तोंडाला काळे फासू…. चंद्रकांत कवडे यांचा इशारा
पारनेर मधील कार्यकर्ते आक्रमक
पारनेर : प्रतिनिधी (दि. ९)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष , मा. खासदार शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा शिरूर तालुक्यातील शरद पवार प्रेमी जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. शिरूर तालुक्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासणार आणि त्यांची गाडी फोडणार असा सज्जड इशारा पाबळ येथील युवक कार्यकर्ते चंद्रकांत कवडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुका हा शरद पवार यांचा बालेकिल्ला असून जुण्या जाणत्या नेत्यांपासून …. युवक कार्यकर्ते तसेच अबालवृद्धांपासून .. तरुणांपर्यंत शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. पारनेर तालुक्याला पवार साहेबांमुळे सोन्याचे दिवस आले आहेत. सर्वसामान्य जनतेचे राहनीमान उंचावले असुन हे सर्व केवळ पवार साहेबांनी दुरदृष्टी ठेऊन केलेल्या विकासकामांचे प्रतिक आहे.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उत्तुंग नेतृत्वाबद्दल सदाभाऊ खोतांनी केलेले वक्तव्य हे निचपणाचा कळस गाठणारे आहे. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत. येणाऱ्या काळात त्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना याची किंमत मोजावी लागेल.असा इशारा खासदार निलेश लंके प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पारनेर तालुका हा पवार साहेबांचा बालेकिल्ला आहे. सदाभाऊ खोत पारनेर तालुक्यात आले तर त्यांची गाड़ी फोडुन त्यांच्या तोंडाला काळे फासन्याचं काम येथील जनता करेल. आणि त्यात सर्वात पुढ़े मी असेल.
…… चंद्रकांत कवडे युवक कार्यकर्ता, पारनेर