उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा … प्रभाकर गावडे
घोड व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचा उपक्रम : माफक दरात फवारणीसाठी ड्रोन
टाकळी हाजी |
शेतकऱ्यांच्या ऊस, कांदा, कलिंगड, मका, सोयाबीन इ. पिकांवर कीटकनाशक, बुरशीनाशक, अन्नद्रव्य फवारणीसाठी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील घोड व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी व इफकोच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनची उपलब्धता करून देण्यात आली. सोमवारी (दि.१७) टाकळी हाजी येथे ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. घोड व्हॅलीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर गावडे, सरपंच अरुणा घोडे, बन्सीशेठ घोडे , दामूशेठ घोडे यांच्या हस्ते ड्रोनचे पूजन करण्यात आले.
ड्रोन द्वारे फवारणी केल्याने शेतकऱ्यांना विषबाधा होत नाही, मजुरांची अडचण येत नाही, पर्यावरणाचे नुकसान होत नाही, उत्पादन वाढवायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे भविष्यात ड्रोनद्वारे फवारणी काळाची गरज असल्याचे मत घोड व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर गावडे यांनी व्यक्त केले
पारंपरिक पद्धतीने शेतकरी पाठीवर पंप घेऊन तसेच एचटीपी किंवा ब्लोअर च्या साह्याने शेतकरी फवारणी करतात, ड्रोनद्वारे एक एकर साठी फक्त दहा लिटर पाण्यातून दहा ते पंधरा मिनिटात शिवाय ३०० रुपये या माफक दरात फवारणी होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
यावेळी घोड व्हॅलीचे संचालक, सभासद तसेच प्रगतशील शेतकरी रवी भाकरे, पंढरी उचाळे, गोरख घोडे,अर्जुन खामकर, दौलत थोरात, शंकर थोरात, दगडू हावलदार, सोनबा खाडे, पोपट गावडे, शांताराम उचाळे, दिलीप सोदक, भरत खामकर, रामदास सोदक , बाळासाहेब जाधव , भाऊ घोडे , किसन गावडे , शांतीलाल गुगळे, बाळू गुगळे, अशोक गावडे, पाराजी गावडे, अर्जुन घोडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ड्रोनद्वारे फवारणी केल्याने शेतकऱ्यांना विषबाधा होत नाही, मजुरांची अडचण येत नाही, पर्यावरणाचे नुकसान होत नाही, उत्पादन वाढवायचे असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे भविष्यात ड्रोनद्वारे फवारणी काळाची गरज आहे.
… प्रभाकर गावडे, संस्थापक अध्यक्ष घोड व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी