ओबीसी सेवा संघ जिल्हा उपाध्यक्षपदी सुमन साळवे
टाकळी हाजी |
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील धडाडीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यां सुमन साळवे यांची निवड झाली आहे. संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या सूचनेवरून राज्य कार्याध्यक्ष प्रा. नानासाहेब टेंगले यांनी याबाबत नुकतेच साळवे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
यावेळी प्रदेश अध्यक्षा रेखा आखाडे,पुणे शहर अध्यक्ष शोभा झिंगाडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शुभांगी धायगुडे, राज्य प्रसिद्ध प्रमुख कादंबरी वेदपाठक, उपाध्यक्षा अर्चना भोंगळे, शिरूर लोकसभा अध्यक्षा सारिका शिंदे, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष किशोरजी मासाळ, सचिव भारतजी भोंग, कार्याध्यक्ष सचिनभाऊ शाहीर आदी मान्यवर उपस्थित होते.
ओबीसी समाजातील अठरा पगड जमातीतील महिलांना सोबत घेऊन विकासासाठी काम करणार.
.…सुमन साळवे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा ओ बी सी सेवा संघ