शासकीय रेखाकला परीक्षेत पूर्वा खुडे चे यश
शिरूर | शासकीय रेखाकला (चित्रकला) परीक्षा २०२३ – २४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर चा एलीमेंटरी व इंटरमिजीएट या दोन्ही ग्रेड परीक्षांचा निकाल १००% लागला आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक रमेश राजगुरे व कलाशिक्षिका नाजनीन आत्तार यांनी मार्गदर्शन केले.
इंटरमिजीएट परीक्षेला एकुण 47 विद्यार्थी बसले होते. विद्यालयाचा100% निकाल लागला असून 6 विद्यार्थ्यांना ‘A’ ग्रेड, 8 विद्यार्थ्यांना ‘B’ ग्रेड, तर 33 विद्यार्थ्यांना ‘C’ ग्रेड मिळालेली आहे. पूर्वा रवींद्र खुडे, संस्कृती रामचंद्र थोरात, कार्तिकी विकास भालेराव, श्रुतिका राजेश गायकवाड, प्रसाद निवृत्ती गायकवाड व प्रतीक दत्तात्रय गायकवाड यांना ‘A’ ग्रेड मिळालेली आहे.
एलीमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी एकूण 16 विद्यार्थी बसलेले होते. ‘A’ ग्रेड मध्ये 3 , ‘B’ ग्रेड मध्ये 1 व ‘C’ ग्रेड मध्ये 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिल्पा रवी शर्मा, सुजित मिनीनाथ पाचर्णे, आकाश अशोक चव्हाण हे विद्यार्थी ‘A’ ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य झाकीरखान पठाण, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, स्कूल कमिटी सदस्य व माजी आमदार सूर्यकांत पलांडे, डॉ राहुल घावटे, त्याचप्रमाणे सर्व सल्लागार समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, गुरुकुल विभाग समिती सदस्य , न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य संजय मचाले, उपमुख्याध्यापक मनोहर काळे, पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे यांनी अभिनंदन केले.