बापूसाहेब गावडे विद्यालयात ३८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

0

 

टाकळी हाजी I  टाकळी हाजी (ता. शिरूर ) येथे राजेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ( दि .७) १९८४/८५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेहमेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव गावडे होते.बेट भागात शिक्षणाची सुविधा निर्माण केल्याने परिसराचा विकास करता आल्याचे प्रतिपादन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी स्नेहमेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

यावेळी परिसरातून प्रभातफेरी काढून पूर्वीचा परिसर व बदल झालेले गावाचीपाहणीकरण्यातआली. तसेच शाळेत परिपाठ , राष्ट्रगीत घेत शिक्षकांनी परिपाठ व वर्गात हजेरी घेतली. त्यावेळी वर्गातील वातावरणाची अनुभूती मिळाल्याचे व समाधान मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अनेक वर्षातून भेट झाल्याने विद्यार्थ्यांनी मनसोक्त गप्पा,गोष्टी,गाणी,ओळख परेड स्नेहभोजन असे कार्यक्रम करत आनंद लुटला.

त्यावेळीचे शिक्षक कैलास फापाळे,फकीर तांबोळी, कोंडिबा कुंभार,, सिताराम गायकवाड, तुकाराम फंड, दिलिप इचके आणि प्राचार्य आर बी.गावडे या शिक्षकांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी निवृत्त प्राचार्य प्रभाकर खोमणे ,माजी विद्यार्थी व पत्रकार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन धोंडीभाऊ जाधव ,प्रविण गुगळे व विद्यार्थ्यांनी केले. शिवाजी बोखारे,बाबा दिक्षित, रविंद्र पाटील, दस्तगिर मोमीन, फुलाबाई गावडे, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गावडे, सूत्रसंचालन प्रविण गायकवाड ,आभार सदाशिव पवार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.