माळवाडी च्या उपसरपंच पदी आदिनाथ भाकरे यांची निवड
टाकळी हाजी l माळवाडी (ता.शिरूर) येथील उपसरपंच आनंदा विठ्ठल भाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि.२५) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी आदिनाथ शिवाजी भाकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सरपंच सोमनाथ भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामसेविका राणी साबळे यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले.
सामाजिक , राजकीय क्षेत्रातील कामाची आवड आणि त्यांचे योगदान यामुळे भाकरे यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनिता गावडे, शिरूर पंचायत समिती माजी सदस्या अरुणा घोडे, डॉ. सुभाष पोकळे, टाकळी हाजी सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, सरपंच सोमनाथ भाकरे, मलठण सोसायटीचे माजी अध्यक्ष नाना फुलसुंदर, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी माळवाडी सोसायटीचे अध्यक्ष दौलत भाकरे, टाकळी हाजीचे माजी उपसरपंच नवनाथ रसाळ, मच्छिंद्र भाकरे,उद्योजक जनार्दन रसाळ,अविनाश भाकरे, रामदास भाकरे, बापुसाहेब गावडे , मानवाधिकार संघटनेन शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर, निघोज सोसायटीचे अध्यक्ष सुनील वराळ, बबन तनपुरे, माजी उपसरपंच आनंदा भाकरे, ग्रामपंचायत सदस्य निलम रसाळ, साधना गारुडकर, पूजा पांढरकर, सुनिता भाकरे, शिवबा संघटनेचे डॉ.दौलत पांढरकर , ओंकार जाधव,समाधान दुडे, रावसाहेब भाकरे, निलेश भाकरे, कैलास भाकरे,तुषार भाकरे, अभिजित भाकरे, संतोष भाकरे,विलास भाकरे, भिमदास भाकरे, अनिल रसाळ , अनिल गारूडकर ,दिपक घोडे , ॲड. दत्तात्रय सोदक, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.