टाकळी हाजी येथे महाराष्ट्र बँक वर्धापन दिन उत्साहात साजरा

0

टाकळी हाजी l महाराष्ट्र बँकेच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त टाकळी हाजी (ता.शिरूर) शाखेमध्ये बँक व ग्राहक यांचे नैतिकतेचे नाते जपण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांनी नागरिकांना विशेष आमंत्रित करून शनिवारी (दि.१६) वर्धापन दिन साजरा केला.

यानिमित्त ग्राहकांसाठी नव्याने सुरू झालेली सभासंसाठीची विमा योजना तसेच बँकेच्या कामकाजाची माहिती व ग्राहक आणि बँक यांचा समन्वय साधण्यासाठी उपाय योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वाहन तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज व महिलांसाठी बचत गटांना कर्जवाटप या विषयाच्या नवीन उपक्रमांची माहिती देण्यात आली.

टाकळी हाजी शाखेची या वर्षातील कर्ज वसुली उल्लेखनीय झाल्याबद्दल वरिष्ठ कार्यालयाकडून पुरस्कार देवून शाखेचा सन्मान करण्यात आला. ग्राहकांसाठी नवीन योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असून यासाठी अधिकारी सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबध्द असल्याचे शाखा अधिकारी अविनाश भातंम्रेकर यांनी सांगितले.

आदर्श सरपंच दामुशेठ घोडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे , दगडूभाई हवलदार, विलास घोडे, ह भ प भाऊसाहेब महाराज चोरे, बाबाजी रासकर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक वृंद, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, व्यावसायिक , खातेदार यांनी बँकेत जावून सदिच्छा व्यक्त केल्या.

शाखा अधिकारी अविनाश भातंम्रेकर, मोरेश्वर आव्हाड, विशाल थोरात, महेश बगाड , ज्योती क्षीरसागर, प्रियांका गावडे,सुहास गावडे, सागर डोळस यांनी उपस्थितांचे आदरातिथ्य तसेच मार्गदर्शन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.