मलठण : मलठण (ता. शिरूर, जि. पुणे) येथून देविदास नानाभाऊ शिंदे (वय 14 वर्षे ) हा मुलगा शिंदेवाडी (मलठण) येथून गुरुवार दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता शाळेत जातो म्हणून घरातून निघून गेला मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
कोणाला आढळून आल्यास किंवा काही माहिती मिळून आल्यास मो. नं. 8459210035 या नंबरवर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांनी केले आहे.