तब्बल 11वर्षानंतर भरला डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा
टाकळी हाजी : प्रतिनिधी
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीम.कांताबाई पानसरे डी.एड कॉलेज(इंग्लिश माध्यम) पुणे (बॅच सन 2010-12) येथील माजी अध्यापक व अध्यापिका यांचा स्नेहमेळावा तब्बल 11 वर्षांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथील डेक्कन जिमखाना येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
बालपण देगा देवा असे आपण म्हणतो, पण गेलेला दिवस पुन्हा येत नाही, पण त्या आठवणींना आपण पुन्हा उजाळा देऊन ते क्षण पुन्हा प्रत्ययात आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न होता. आत्तापर्यंतच्या जीवनातील प्रवासाची सर्वांनी आपुलकीने विचारपूस केली,कॉलेज जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन करून झाली.सर्वांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी मुंबई,सोलापूर, अहमदनगर, जालना, पुणे, सातारा, आदी जिल्ह्यांतून आले होते.
यातील बहुतांशी पुणे व मुंबई महानगर पालिकेत शिक्षक, खाजगी शाळेत शिक्षक,मंत्रालयात अधिकारी,पोलीस,सैन्यदल,राज्य परिवहन महामंडळ, बँक, पत्रकार,व्यवसाय, तर काहीजण उत्कृष्ठ पद्धतीने शेती करत आहे.
अनिता कुंभार,दादासाहेब गुंड,स्नेहा गाढवे,अभिजित धामणे,सारिका भोये,किरण नरळे यांनी कॉलेज आठवणींना उजाळा दिला.स्नेह मेळाव्यासाठी पार्वती भानवसे,प्रियंका कांबळे,माधुरी बदर,नूतन माने,वंदना पडवी,निकिता जाधव,अमोल लोहार,स्वप्निल गावडे यांनी पुन्हा भेटण्याचा संकल्प करून,एक उत्तम निधी उभारून गरिबांना मदत करण्याचे ठरविले.प्रास्ताविक स्वप्ना व्होरकाटे यांनी तर सूत्रसंचालन विजय थोरात तर आभार तेजस ब्राम्हणे यांनी मानले.
11 वर्षांनंतर आम्ही सर्वजण भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असला तरी पुन्हा एकदा सर्वजण एकत्रित येऊन आनंदित झाले,पुढील भविष्यकाळात सन (2010-12) बॅचचा मोठा स्नेहमेळावा आयोजित करण्याचे सर्वांनी ठरविले…..
विजय थोरात व्यवस्थापक, आय सी आय सी आय बँक