स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामाचा माळवाडीत श्रीगणेशा

0

टाकळी हाजी : प्रतिनिधी


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनच्या शिरूर तालुक्यातील पहिल्याच कामाचा श्रीगणेशा माळवाडी येथे बुधवारी (दि.९) करण्यात आला. गटविकास अधिकारी महेश डोके,पोलीस निरीक्षक संजय जगताप, विस्तार अधिकारी संजय गावडे यांच्या शुभहस्ते माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे,माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

सरपंच सोमनाथ भाकरे,उपसरपंच आनंदा भाकरे , ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भाकरे ,निलम रसाळ,साधना गारुडकर,पूजा पांढरकर,सुनिता भाकरे, ग्रामसेविका राणी साबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.यावेळी प्रकल्प व्यवस्थापक शरद गारूडकर, संदीप खामकर शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, माळवाडी सोसायटीचे चेअरमन दौलत भाकरे, टाकळी हाजी चे माजी उपसरपंच नवनाथ रसाळ ,माजी ग्रामपंचायत सदस्य दशरथ भाकरे , शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष योगेश भाकरे ,उपाध्यक्ष रामदास भुजबळ, ह.भ.प.सिताराम भाकरे,  अर्जुन रसाळ , डॉ दौलत पांढरकर , राहुल गारुडकर , कैलास भाकरे,  वसंत टिळेकर, शंकर भाकरे, संतोष भाकरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भाकरे, आभार मानवाधिकार संस्थेचे तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर यांनी केले.

 

माळवाडी ग्रामपंचायत नव्यानेच स्थापन झाली असून कार्यकारी मंडळास एक वर्ष कालावधी पूर्ण झाला आहे.ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी यांच्या कामाबरोबरच आमचेही काम स्वच्छ्ताच आहे ,फक्त स्वरूप वेगळे असल्याने आपण सर्वजण मिळून स्वच्छ्ता करू यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.