टाकळी हाजी : प्रतिनिधी
अमरावती येथील सभेत देशातील थोर पुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याने महापुरुषांचे चारित्र्य हनन केले, त्यांनी केलेले वक्तव्ये समाज माध्यमातून तीव्रतेने प्रसारित झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी.असे निवेदन शिरूर तालुका माळी महासंघाच्या वतीने सोमवारी (दि.७) शिरूर तहसीलदारांना देण्यात आले.
भिडे वारंवार अशी वक्तव्ये करून समाजाच्या भावना दुखवत असतात म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी
यावेळी माळी महासंघाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर दरवडे, युवक आघाडी सचिव ओंकार बिरदवडे, तालुका अध्यक्ष विजय खेडकर, कार्याध्यक्ष बाबाजी रासकर, सचिव अनिल अभंग, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष अर्जुन तोडकर, उपाध्यक्ष नवनाथ खरपुडे, बनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.