कोयता दाखवत दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात

0

टाकळी हाजी : प्रतिनिधी

मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे अष्टविनायक मार्गावर शनिवारी (दि.५) कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही रस्त्यावर कोयता घेवून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे . तरीही कोणतीही भीती मनात न बाळगता असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

 

शिंदेवाडी येथील दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादाच्या कारणास्तव शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून बारा वर्षापूर्वी संजय रखमा शिंदे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता. संजय शिंदे हा चार वर्ष येरवडा कारागृहात होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना या युवकाने हातात कोयता वर करून अष्टविनायक मार्गावर तीन ते चार वेळा चकरा मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कोयता दाखवत दहशत,दमदाटी व शिवीगाळ केली म्हणून शिंदेवाडी येथील भानुदास ज्ञानोबा शिंदे यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल केल्याने टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरिक्षक सुनिल उगले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपीस अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.