टाकळी हाजी : प्रतिनिधी
कवठे येमाई (ता.शिरूर) येथील अवैध गावठी दारू गाळप (हातभट्टी) तसेच ताडी विक्री धंद्यांवर छापे टाकून शिरूर पोलिसांनी शुक्रवारी ( दि. २८) छापा टाकून लाखो रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला तर दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूसाठी लागणारे १४ बॅरेल मधील २८०० लिटर कच्चे रसायन (अंदाजे किंमत १ लाख), ३५ लिटर तयार दारू, ५ लिटर ताडी असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले . सूरज लालासाहेब झेंडे व सागर गडगुल यांच्यावर गुन्हे दखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले , पोलीस अंमलदार धनंजय थेऊरकर, दिपक पवार, सुरेश नागलोत, सोनू तावरे, विशाल पालवे यांनी केली.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलीस नाईक धनंजय थेऊरकर करत आहेत.
विशेष पथक स्थापन करून या प्रकारच्या कारवाया
कायम सुरू ठेवल्या जाणार आहेत. अवैध दारू,ताडी धंदे याबाबतचे गुन्हे वारंवार करणारे गुन्हेगारांवर एमपीडीए सारख्या प्रतिबंधक व तडीपारी/हद्दपारी अशा स्वरूपाच्या कडक कारवाया केल्या जाणार आहेत.संजय जगताप…पोलीस निरीक्षक,शिरूर