शिरुर मधील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार तडीपार : पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची कारवाई

0

शिरूर : प्रतिनिधी

शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये राहणारे शिरूर पोलीस ठाणे येथील सन २०१७ ते सन २०२२ या कालावधीमधील रेकॉर्डवरील दोघांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तडीपार केले आहे.अशुतोष मिलींद काळे ( वय २१ वर्षे रा. सय्यदबाबानगर शिरूर) व शरद बन्सी मल्लाव (वय २५ वर्षे रा. काची आळी शिरूर) अशी त्यांची नावे असून यांनी शिरूर शहर व परीसरामध्ये दहशत करणे, चोरी करणे, चोरीची अप्रमाणिकपणे मालमत्ता स्विकारणे, गंभीर दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, स्फोटक पदार्थ बाळगणे, शिवीगाळ दमदाटी करणे, त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात लागोपाठ ०७ गुन्हे दाखल झाले होते.

त्यांना वेळोवेळी पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले होते. परंतु त्यांचे वर्तणूकीमध्ये कोणताही फरक झाला नसल्याने वरील आरोपीविरूध्द शिरूर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधिक्षक यांचे कार्यालयाकडे हददपार / तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. याची गंभीर दखल घेत उपरोक्त प्रकरणात सुनावणी घेवुन वरील दोन्ही आरोपीतांना १ वर्षाकरीता पुणे जिल्हा ( पिंपरीचिंचवड शहर व पुणे शहर हददीसह) अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन दि. २०/७/२०२३ पासुन तडीपार करण्यात आले आहे. व यापुढील कालावधीतही परीसरात दशहत व गुंडगीरी करणा-यांवर अशाच प्रकारे कठोर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे.

             वरील आरोपीतांवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार करणेकामी शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी,पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस शिपाई सचिन भोई ( शिरूर पोलीस ठाणे) यांनी व त्याच बरोबर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस हवालदार महेश बनकर, पोलीस हवालदार रामदास बाबर यांनी कामकाज पाहीले.

Leave A Reply

Your email address will not be published.