टाकळी हाजीच्या शेतकऱ्यांना डाळिंबामुळे नवसंजीवनी

नामांकित कंपनीचे तीन ब्लोअरची एकाच वेळी खरेदी 

0

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी


            टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील डाळींब शेतकऱ्यांसाठी बाजारभाव चांगला मिळाल्याने चालू हंगाम गोड झाला असून सुधारित यांत्रिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. येथील डाळींब शेतकरी रमेश गावडे,नारायण कांदळकर,संतोष गावडे या शेतकऱ्यांनी फवारणी साठी नवीन तंत्रज्ञानाने बनविलेले नामांकित कंपनीचे सुमारे चौदा लाखांचे तीन ब्लोअर खरेदी केले आहेत.

एरवी शेती अवजारे खरेदी करताना अनेकदा विचार करणारे शेतकरी डाळिंब पिकाने नवसंजीवनी दिल्यामुळे लाखो रुपयांची शेती अवजारे खरेदी करताना कोणताही विचार न करता दाखवत असलेले साहस तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या ब्लोअर मुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्राची फवारणी होत असल्याने औषधाची पर्यायाने खर्चाची बचत होणार आहे. शिवाय यामध्ये मिश्रणाची आधुनिक पद्धती कार्यरत केली असल्याने पूर्ण पाण्यात ब्लोअर सुरू झाल्यापासून पाणी संपेपर्यंत मिश्रणाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याने औषधाची मात्रा समान राहणार आहे याचा फायदा फळांचा दर्जा सुधारण्यासाठी होणार आहे. अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. नवीन सर्व ब्लोअरचे उद्घाटन कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रोहन कृषी सेवा केंद्र येथे करण्यात आले.

शेतकऱ्यांना डाळींब शेतीने मोठा आधार दिला असून भविष्यात तरुण वर्गाने पाणी मुबलक असताना पारंपरिक पिके घेण्यापेक्षा हमखास उत्पादन देणाऱ्या फळबागांची लागवड करावी. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
—- कैलास गावडे , डाळिंब मार्गदर्शक

Leave A Reply

Your email address will not be published.