कवठे येमाई च्या उपसरपंच पदी उत्तम जाधव यांची निवड
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
कवठे येमाई (ता.शिरूर) येथील उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि.१९) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उत्तम नथू जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाली आहे.
सामाजिक , राजकीय क्षेत्रातील कामाची आवड आणि त्यांचे योगदान यामुळे जाधव यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे, अरुणा घोडे, सरपंच सुनिता पोकळे, टाकळी हाजी चे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.