कवठे येमाईच्या सरपंच पदी सुनिता बबनराव पोकळे
कवठे येमाई
शिरूर तालुक्यातीच्या पश्चिम भागातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कवठे येमाईच्या सरपंच पदी सुनिता बबनराव पोकळे यांची निवड झाली. शुक्रवार दि. २१ ही येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सदस्यांच्या बैठकीतून ही निवड करण्यात आली. निवडीनंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
या पूर्वीच्या सरपंच मंगल रामदास सांडभोर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ही निवडणुक घेण्यात आली .या ग्रामपंचायत वर शिवसेना पुरस्कृत डॉ.सुभाष पोकळे यांच्या पॅनलचे वर्चस्व आहे. विरोधी गट हा राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांचा आहे.सतरा जणांची सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये सोळा सदस्यांनी मतदानात भाग घेतला शिवसेना पुरस्कृत पॅनलकडुन सुनिता बबनराव पोकळे व राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलकडुन मनिषा पांडुरंग भोर यांनी अर्ज भरला होता. विजयानंतर सुनिता पोकळे यांनी जनतेकरीता ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या सामान्य माणसाकरीता राबविण्यात येतील असे आश्वासन नागरिकांना दिले. शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी अभिनंदन करुन सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरीता यापुढील काळात ही जोमाने कार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिरूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
टाकळी हाजी च्या सरपंच अरूनाताई घोडे यांनी नवनिर्वाचित सरपंच पोकळे यांचे अभिनंदन केले. यावेळी रोहिदास हिलाळ,अमोल पोकळे,रामदास पवार,विलासराव रोहिले,भाऊसाहेब पोकळे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणुक अधिकारी म्हणुन मंडल अधिकारी माधुरी बागले यांनी काम पाहिले.