टाकळी हाजी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
टाकळी हाजी : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त टाकळी हाजी येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना योगेश बारहाते आणि अंगणवाडी सेविका साधना सतीश गावडे यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शासनाच्या परिपत्रका नुसार या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल ,श्रीफळ, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी सरपंच अरूणाताई घोडे,उपसरपंच गोविंद गावडे, माजी सरपंच दामुशेठ घोडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, अर्जुन खामकर, विलास साबळे, बाबाजी साबळे, भरत खामकर,प्रियांका बारहाते, शंकर थोरात, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे,व्हा.चेअरमन पत्रकार साहेबराव लोखंडे,तज्ञ संचालक म्हतू साबळे,पतसंस्थेचे संचालक बाळासाहेब टेमकर,माजी सदस्य अंकुश उचाळे,भाऊसाहेब टेमकर,नामदेव लोखंडे, पोपट उचाळे, माऊली पवळे, संजय टेमकर, जबानाना घोडे, राहुल रसाळ, हरी साबळे, पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे,क्लार्क सागर घोडे, बापू गाडीलकर ,अंगणवाडी पर्यवेक्षक अंजली हारके, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे यांनी तर आभार पत्रकार साहेबराव लोखंडे यांनी मानले.