सरपंच सोमनाथ भाकरे यांची सहकाऱ्यांसह हिवरे बाजार ला भेट
वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत गाव आदर्श बनविण्याचा संकल्प
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शिवबा संघटनेच्या माध्यमातून युवकांना आणि ग्रामस्थांना एकत्र करून समाजसेवेचे कार्य करत असताना तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे या ध्येयवेड्या तरुणाने विकासाची भूमिका घेत टाकळी हाजी ग्रामपंचायतीमधुन माळवाडी ग्रामपंचायत विभक्त केली. निवडणुकीला सामोरे जात एकहाती सत्ता स्थापन करून सरपंच पदी विराजमान असलेले सोमनाथ भाकरे यांनी त्यांचा वाढदिवस केक कापून किंवा हारतुरे घेवून साजरा करण्याऐवजी माळवाडी गाव महाराष्ट्रातील एक मॉडेल बनविण्यासाठी आदर्श सांसद ग्राम हिवरे बाजार गावाला सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केली.
अवास्तव खर्च किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन न करता उपसरपंच आनंदा भाकरे, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ भाकरे, निलम रसाळ ,साधना गारुडकर, पूजा पांढरकर ,ग्रामसेविका राणीताई साबळे , तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश भाकरे, सिमा भाकरे,सूर्यकांत भाकरे, गणेश पवार ,प्रशांत भाकरे ,मोहन घोडे, मयूर नायर, एडव्होकेट दत्तात्रय सोदक, तुषार भाकरे ,श्याम रसाळ, धनंजय पांढरकर ,पत्रकार योगेश भाकरे ,अभिजीत भाकरे , रामदास सोदक, पोलीस उपनिरीक्षक श्वेता भाकरे, अभी भाकरे,राहुल गारुडकर,बाळासाहेब रसाळ, डॉक्टर दौलत पांढरकर,पत्रकार साहेबराव लोखंडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
हिवरे बाजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावचा कायापालट कसा झाला,त्यासाठी विकासाचे महामेरू पोपटराव पवार आणि ग्रामस्थांनी दिलेले योगदान याविषयी पद्धतशीर मार्गदर्शन केले. त्यांना मिळालेले पुरस्कार पाहून माळवाडी ग्रामस्थ सर्वजण भारावून गेले.
ग्रामपंचायत कार्यकारिणी आणि ग्रामस्थांना बरोबर घेवून गावच्या विकासाचे धोरण ठरविण्यासाठी हिवरे बाजार गावची ची सफर केली.
……सोमनाथ भाकरे प्रथम सरपंच माळवाडी