कवठे येमाई येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
आयोजक : रामविजय फाऊंडेशन व डॉक्टर सुभाष पोकळे मित्र परिवार
पिंपरखेड : प्रतिनिधी
कवठे येमाई (ता.शिरूर) येथे संपन्न झालेल्या सर्वधर्मीय जगदंबा सामुदायिक शुभविवाह सोहळ्यात एकूण सात जोडपी विवाहबद्ध झाली. रामविजय फाउंडेशन व डॉ सुभाष पोकळे मित्रपरिवार यांच्या वतीने या विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. गेली पंधरा वर्षांची सामुदायिक विवाह सोहळ्याची हि परंपरा कायम ठेवली असून भविष्यातही सर्वसामान्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. दरवर्षी अनेक जोडपी या ठिकाणी विवाहबद्ध होत असतात. या सामुदायिक सोहळ्याच्या माध्यमातून गोरगरिबांना याचा मोठा फायदा होत असून सर्वसामान्य जनतेची आर्थिक बचत होण्यास मोठी मदत होत असल्याची माहिती आयोजक आणि माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी दिली.
यावेळी संपन्न झालेल्या या विवाहसोहळ्यात विविध क्षेत्रातील विद्यार्थी व कर्मचारी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रमिला इचके यांना शिष्यवृत्ती पुरस्कार देण्यात आला. तर एमबीबीएस परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल वेदांत पोकळे तर जेईई परीक्षेत विशेष गुण प्राप्त केल्याबद्दल विवेक वागदरे यांचा गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये आलेल्या चित्रा इचके , निवृत्त कर्मचारी अब्दुल रहमान तांबोळी, पोलीस दलात भरती झालेल्या सुषमा हिलाळ, नामदेव हिलाळ यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
याप्रसंगी माजी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे , माजी सभापती देवदत्त निकम, मंगलदास बांदल, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, अरुण गिरे, देविदास दरेकर, मधुकर उचाळे, पांडुरगआण्णा थोरात, प्रभाकर गावडे, राहुल पाचर्णे, सावित्रा थोरात, अरूणा घोडे ,कल्पना पोकळे, रविंद्र करंजखेले, घोडगंगाचे संचालक सुहास थोरात, धोंडिभाऊ पिंगट, खंडू भाईक, सोपानराव भाकरे, संपत पानमंद, बाबाजी निचित, बाळशिराम ढोमे, वासुदेव जोरी, सुदाम इचके, संतोष मिंडे, विलास थोरात यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.