राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी कल्याण काका आखाडे
: सावता परिषदेची राजकारणात एन्ट्री
टाकळी हाजी : प्रतिनिधी
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आखाडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच सावता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. सावता परिषदेच्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम कल्याण काका आखाडे यांनी केले आहे. सर्वसामान्यांना उपलब्ध होणारा, जनसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून कल्याण काका यांची ओळख आहे.
त्यांच्या निवडीनंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सावता परिषदेच्या वतीने आनंद साजरा करण्यात येत आहे.